स्पावर छापा; पाच पीडित महिलांची सुटका
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 31
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची बेलापूरमध्ये कारवाई; महिला मॅनेजरला अटक
नवी मुंबई : स्पामध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बेलापूर येथील एका स्पावर छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी अनैतिक व्यापार तसेच अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, 24 सप्टेंबर रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना बेलापूर येथील ‘अथेन्स स्पा’मध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंच आणि बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. संकेत मिळताच पोलिसांच्या पथकाने स्पावर छापा टाकला. यावेळी तेथे वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या पाच पीडित महिला आढळून आल्या.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, स्पा मॅनेजरसह काही आरोपींनी संगनमत करून या महिलांना मसाजच्या कामाच्या नावाखाली स्पामध्ये आणले आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. तसेच बनावट ग्राहकांकडून वेश्याव्यवसायाच्या मोबदल्याचे पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पिटा कायदा कलम 3, 4 व 7 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपीला 24 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती. प्रकरणाचा पुढील तपास सीबीडी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख आणि पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai