‘आंतरराष्ट्रीय इंडिया वॉटर वीक’ मध्ये नमुंमपाचे सादरीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 22
जलपुनर्वापर मॉडेलची आयुक्तांकडून अभ्यासपूर्ण मांडणी
नवी मुंबई ः वापरलेले सांडपाणी हे टाकाऊ नसून मौल्यवान संसाधन आहे. तंत्रज्ञान, डिजिटल नवोपक्रम आणि नाविन्यपूर्ण वित्तीय व्यवस्थेच्या माध्यमातून त्याचा प्रभावी पुनर्वापर केल्यास जलसुरक्षित व शाश्वत भविष्याची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
नवी दिल्ली येथे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय इंडिया वॉटर वीक 2026’ अंतर्गत झऋ8: र्ठीीरश्रड्ढणीलरप थरींशी ॠीळवी | खपर्पेींरींळेप ळप डरषश ठर्शीीश ेष ढीशरींशव थरींश या विशेष सत्रात डॉ. शिंदे पॅनलिस्ट म्हणून सहभागी झाले. र्र्ऋीीीींश-ठशरवू उळींळशी: करीपशीीळपस ऊळसळींरश्रळूरींळेप, अख रपव खपर्पेींरींर्ळींश ऋळपरपलश षेी उळीर्लीश्ररीळूीं या विषयावरील पॅनल चर्चेत त्यांनी नवी मुंबईच्या जलव्यवस्थापनाचा अनुभव मांडला. नवी मुंबई महापालिकेकडून दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे 100 टक्के शुद्धीकरण केले जात असून, महापालिकेकडे 454 दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाणी प्रक्रिया क्षमता आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्योग, उद्याने, बांधकाम प्रकल्प तसेच अन्य बिगर-पेयजल कारणांसाठी केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्याबरोबरच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यास मदत होत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्यातील कराराच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांना पर्यायी जलस्रोत उपलब्ध झाला असून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढण्यासही हातभार लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराची क्षमता आणखी वाढविण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी, ॠखड, खपींशसीरींशव उेाारपव रपव उेपेीींश्र उशपीींश (खउउउ) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषणाचा वापर नवी मुंबईत करण्यात येत असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. वापरलेल्या पाण्याचे योग्य मोजमाप, व्यवस्थापन आणि आर्थिक मूल्यमापन केल्यास त्यातून आर्थिक मूल्य निर्माण करता येते आणि जलपरिपूर्ण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. या पॅनल चर्चेचे अध्यक्षपद केंद्र सरकारच्या अमृत विभागाच्या सहसचिव ईशा कालिया यांनी भूषविले. तेलंगणा सरकारच्या नगरपालिका प्रशासन विभागाच्या सचिव डॉ. टी.के. श्रीदेवी सह-अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जॅकब्सचे विनोद सिंग, जागतिक बँकेच्या कारमेन रोजा यी-बतिस्ता आणि डिजिटल पाणीच्या सुश्री मानसी यांच्यासह विविध तज्ज्ञांनी चर्चेत सहभाग घेतला. तामिळनाडू व नागपूर येथील जलपुनर्वापर मॉडेल्सचे अनुभव आणि केस स्टडीजही यावेळी सादर करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai