इन्व्हेस्ट महाराष्ट्रमध्ये 8.57 लाख कोटींचे सामंजस्य करार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 33
2.91 लाख रोजगार निर्मिती; 67 करारांवर स्वाक्षऱ्या
मुंबई ः महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारे 8 लाख 57 हजार 452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गुंतवणुकीतून 2 लाख 91 हजार 109 रोजगारांच्या निर्मितीची अपेक्षा आहे. या करारांमध्ये एरोस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रातील प्रत्येकी 10 करारांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर क्षेत्र आघाडीवर असून या क्षेत्रात 4 लाख 15 हजार 490 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.
ऊर्जा, क्लीनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1 लाख 2 हजार 519 कोटी रुपयांचे करार झाले आहेत. अंतरिक्ष व संरक्षण क्षेत्रात 27 हजार 930 कोटी रुपये, तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात 75 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 12 हजार 651 कोटी रुपये, आरोग्य क्षेत्रात 6 हजार 500 कोटी रुपये, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स व बांधकाम साहित्य क्षेत्रात 18 हजार 751 कोटी रुपये, तसेच स्टील उत्पादन क्षेत्रात 7 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स क्षेत्रात 8 हजार 801 कोटी रुपये, तर अन्य विविध क्षेत्रांत 1 लाख 82 हजार 810 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या समिटच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या या गुंतवणूक करारांमुळे राज्यातील औद्योगिक विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योग आणि मोठ्या प्रमाणातील रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक उद्योगांच्या विस्ताराला हातभार लावावा, असे फडणवीस यांनी सांगितले.
- 8.5 लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक
- ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभासाठी 67 प्रस्तावित सामंजस्य करारांचे पोर्टफोलिओ तयार करण्यात आले असून, त्यातून 8.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणि तीन लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणुकीत डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, प्रगत उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण, आरोग्यसेवा आणि कृषीप्रक्रिया यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून, गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीने काम करेल. गुंतवणूकदाराने प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai