पुनर्विकासासाठी नवी मुंबईतील सोसायट्यांची गर्दी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 37
पुनर्विकास प्रदर्शनाला 1,567 गृहनिर्माण संस्थांचा सहभाग; 35 हून अधिक विकासकांशी थेट संवाद
नवी मुंबई : जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येत असताना, योग्य माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचा कल वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. क्रेडाई एमसीएचआय यूथ एनएमआरच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘इज ऑफ डुइंग रिडेव्हलपमेंट’ च्या दुसऱ्या आवृत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात 1,567 गृहनिर्माण संस्था, 35 हून अधिक विकासक आणि दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
नवी मुंबई आणि रायगड परिसरातील अनेक जुन्या गृहनिर्माण संस्थांसमोर पुनर्विकासाचे आव्हान आहे. मात्र पुनर्विकासाची क्षमता, प्रकल्पाची व्यवहार्यता, आर्थिक गणित, विकासकाची विश्वासार्हता, तांत्रिक बाबी आणि कायदेशीर प्रक्रिया याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक संस्थांसमोर निर्णय घेण्याचे आव्हान असते. याच पार्श्वभूमीवर प्रदर्शनात विविध चर्चासत्रे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना विविध विकासकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. संस्थांना पुनर्विकासाचे उपलब्ध पर्याय, विकासकाचा अनुभव, प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आर्थिक बाबी समजून घेता आल्या. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेची परिस्थिती आणि गरज वेगळी असल्याने पुनर्विकासासाठी एकच पद्धत सर्व संस्थांना लागू होऊ शकत नाही. त्यामुळे विकासकाची निवड करण्यापूर्वी संस्थेची विकासक्षमता, आर्थिक व्यवहार्यता, रहिवाशांच्या अपेक्षा आणि संबंधित विकासकाचा अनुभव तपासणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले.
‘इज ऑफ डुइंग रिडेव्हलपमेंट’ उपक्रमाची पहिली आवृत्ती गेल्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे 800 ते 1,000 गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सुमारे 25 पुनर्विकास प्रकल्प सुरू झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यंदा सहभागी संस्थांची संख्या 1,567 वर पोहोचल्याने नवी मुंबई आणि रायगड परिसरातील सोसायट्यांमध्ये पुनर्विकासाबाबत माहिती घेण्याची उत्सुकता वाढत असल्याचे आयोजकांनी सांगितले. “पुनर्विकासाबाबत योग्य माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. संस्थांना उपलब्ध पर्याय समजून घेऊन योग्य निर्णय घेता यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे,” असे क्रेडाई एमसीएचआय यूथ एनएमआरचे अध्यक्ष सुमित अहलुवालिया यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai