जिल्हास्तरीय शालेय ‘कबड्डी’ स्पर्धेत 233 संघांचा सहभाग
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2026
- 29
नवी मुंबई ः महापालिकेस सन 2009-10 पासून शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्यापासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांचे सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यामधील कबड्डी खेळाच्या सन 2026-27 वर्षातील नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय ‘कबड्डी’ स्पर्धा तुर्भेगाव येथील डॉ.सी.वी.सामंत शाळा व महाविद्यालयाच्या मैदानावर अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 14,17 व 19 वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात एकूण 233 संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धा तीन दिवसात संपन्न झाल्या असून विद्यार्थ्यांनी अत्यंत ताकदीने आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील 14 वर्षाआतील मुलांच्या गटात नमुंमपा शाळा क्रं.20, तुर्भे शाळेच्या संघाने अंतिम लढतीत शेतकरी शिक्षण संस्था घणसोली या संघावर 13:03 अशी 10 गुणांनी मात करीत अजिंक्यपद पटकाविले. विजेता संघ मुंबई विभाग स्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत 14,17 व 19 वर्षाआतील मुलामुलींच्या प्रत्येक गटातील अंतिम विजेत्या संघांना पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेसाठी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai