बहुउद्देशीय समाजसेवा केंद्र धुळखात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 33
तातडीने सुरु करण्याचे प्रहारची मागणी
पनवेल ः कामोठे, सेक्टर-21 येथे सिडकोने सुमारे 4 कोटी रुपये खर्चुन उभारलेले बहुउद्देशीय समाजसेवा केंद्र 6 वर्षांपासून धुळखात पडून आहे. हे केंद्र तातडीने सुरु करुन नागरिकांना मंगलकार्य, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी प्रहार संघटनाने पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, महिनाभरात केंद्र सुरु न झाल्यास 2 डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहारचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील शिरीषकर यांनी दिला आहे.
कामोठेकरांना विवाहसोहळे, सामाजिक कार्यक्रम आणि अन्य उपक्रमांसाठी खासगी सभागृह भाड्याने घ्यावे लागत असल्याने सिडकोकडे बहुउद्देशीय सभागृहाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने 2018 मध्ये सेक्टर-21 येथे या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र, 6 वर्षांहून अधिक काळ लोटूनही सदर केंद्र नागरिकांसाठी खुले झालेले नाही. महापालिकेने या इमारतीत वैद्यकीय सेवा केंद्र आणि डेटा सेंटर सुरु केले असून, मूळ उद्देशासाठी सभागृह उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, स्वयंपाकगृह, कार्यालय आणि ग्रीन रुमची सुविधा आहे. पहिल्या ;मजल्यावर सांस्कृतिक वर्ग, बाल कार्यशाळा आणि डॉक्टरांसाठी खोल्यांची व्यवस्था आहे. तर दुसऱ्या मजल्यावर इनडोअर खेळ, वाचनालय आणि कार्यशाळांसाठी जागा उपलब्ध आहे. एवढ्या सुविधा असूनही समाजसेवा केंद्राचा नागरिकांना लाभ मिळत नसल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे.
एकता सामाजिक संस्थेसह विविध संस्था आणि संघटनांनी गेल्या 5 वर्षांपासून सिडको आणि पनवेल महापालिकेकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रश्न माग न लागल्याने प्रहारच्या शिष्टमंडळाने आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी ॲड. अजय तापकीर, ॲड. मनोज टेकाडे, अजय कदम, राहुल तेलंग, पंकज मोहिते आणि अभिनव येलवे उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai