एकनाथ शिंदेंचा नाईकांना चेकमेट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 27, 2026
- 29
शिल्पकारांचा फसला डाव; सहायक संचालक केकाण यांचा वाढला भाव
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने तीन वेळा सहायक संचालक सोमनाथ केकाण यांना निलंबित करुनही शासनाने त्यांना 31 मे 2027 पर्यंत मुदतवाढ दिल्याने पुन्हा एकदा सत्ताधारी तोंडघशी पडले आहेत. पालिकेने हटविलेले आरक्षण व दिलेल्या बांधकाम परवानग्या यावरुन सत्ताधाऱ्यांनी केकाण यांना लक्ष केले आहे. परंतु, नगरविकास विभागाने केकाण यांची पाठराखण करत पालिकेचे सर्व ठराव विखंडीत करत त्यांना अभय दिल्याने शिंदेंच्या नगरविकास विभागाने नाईकांना पुन्हा चेकमेट दिला आहे.
सध्या नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांच्यात कुरघोडीचे राजकारण जोरात सुरु आहे. नाईक संधी मिळेल तेथे शिंदेंवर निशाणा साधत आहेत तर शिंदेही टांगा पलटी करण्याची भाषा बोलत आहेत. शिंदेंच्या ठाण्यात नाईकांनी जनता दरबार घेऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असला तरी शिंदेंनेही आपल्या प्याद्यांच्या माध्यमातून नाईकांवर कुरघोडी करणे सुरुच ठेवले आहे. नुकतेच नाईकांच्या क्रिस्टल हाऊसवर जनहित याचिका दाखल करुन त्याचे स्थलांतरण करणे नाईकांना भाग पाडल्याचे बोलले जाते. निवडणुकीत शिंदेंनी नवी मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तरी नाईकांच्या हातात सत्ता आल्याने ते शिंदे गटाला पालिकेत नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी नवी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात मार्गी लावल्याने नवी मुंबइकरांचे पुनर्विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सत्ताधाऱ्यांनीही प्रशासकीय काळात विरोधकांशी निगडीत देण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांच्या बांधकाम परवानग्यांवर आक्षेप घेऊन त्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला तरी शिंदेंमुळे सत्त्ताधाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. या सर्व प्रकरणात सहायक संचालक सोमनाथ केकाण यांची साथ विरोधकांना मिळाल्याच्या गैरसमजामुळे सर्वसाधारण सभेत त्यांना लक्ष करण्यात आले. संपुर्ण दिवस केकाण यांच्यांवरच चर्चा करण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानल्याचे नवी मुंबईकरांनी पाहिले आहे. तीनवेळा महापौर सुजाता पाटील यांनी केकाण यांना निलंबित करण्याचा ठराव पारित केला तरी शिंदे यांचे सहकारी किशोर पाटकर यांनी सदर ठराव विखंडीत करुन आणल्याने केकाण यांचे सत्ताधारी काहीही वाकडे करु शकले नाहीत. गणेश नाईक गेल्या काही दिवसांपासून सिडको व पालिका अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यशैलीबाबत उठसूट धारेवर धरुन त्यांचेवर कारवाई करण्याचे सुतोवाच करत आहेत. परंतु, शिंदे यांनी काहीही प्रतिउत्तर न देता नाईकांची प्रत्येक खेळी त्यांच्यावरच उलटवत आहेत. याही प्रकरणात त्यांनी कोणताही गाजावाजा न करता केकाण यांचे निलंबन रद्द करुन उलट त्यांना मुदतवाढ देऊन नाईकांना चेकमेट दिला आहे.
- पाटकरांना नवी मुंबईत ताकद
नवी मुंबईचे सर्वेसर्वा म्हणून ओळख असणाऱ्या गणेश नाईक यांना शिंदे सेनेकडून सध्या किशोर पाटकर हे उत्तर देण्यात आघाडीवर दिसत आहेत. विरोधी पक्षनेतेपदी विजय चौगुले असले तरी त्यांच्याकडून ठोस असा विरोध आणि प्रतिवाद करण्यात येत नसल्याने सभागृहात त्यांची छाप पडत नसल्याची चर्चा आहे. लवकरच एकनाथ शिंदे माजी नगरसेवक मनोहर मढवी यांना पाटकर यांच्या साथीला पाठवणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेना ठामपणे उभी करण्यासाठी पाटकरांना पाठबळ देणार असल्याची चर्चा सध्या शिवसेनेत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai