फळ व कांदा-बटाटा मार्केटही सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- May 23, 2020
- 816
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही दिवसांसाठी हे मार्केट बंद ठेवण्यात आले होते. गुरुवारपासून फळ व कांदा-बटाटा मार्केटही सुरू झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एपीएमसीमध्ये उपाययोजना करण्यात येत असून येणार्या सर्वांची तपासणी केली जात आहे. दिवसभरात 860 टन फळांची आवक झाली. आवक झाल्याने मुंबई व नवी मुंबईमधील सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
दहा दिवसांच्या बंदनंतर फळ मार्केट पुन्हा सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी 264 ट्रक, टेम्पोंतून 860 टन फळांची आवक झाली आहे. यामध्ये 570 टन आंबा, 138 टन कलिंगड, 63 टन अननस, 52 टन खरबूजचा समावेश आहे. चिकू, द्राक्ष, डाळींब, पपई, संत्री व मोसंबीचीही आवक झाली आहे. कोकणातून हापूस मोठ्या प्रमाणात आला आहे. एपीएमसीमध्ये 166 टन लसून, 360 टन कांदा व 509 टन बटाट्याचीही आवक झाली आहे. मार्केटमध्ये होतेयसर्वांची तपासणीमार्केटमध्ये एक हजार टन कांदा, बटाटा व लसूनही विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे भाजीपाला, धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एपीएमसीमध्ये उपाययोजना करण्यात येत असून येणार्या सर्वांची तपासणी केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai