रायगडमध्ये कोविड कॉर्नर उभारणार
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 21, 2020
- 809
अलिबाग ः करोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड कॉर्नर तयार करण्यात येणार असून तेथे रुग्णांसाठी दोन खांटाची सोय करण्यात येणार आहे. यामुळे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार होणार आहेत. कोविड कॉर्नर तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून तपासणी मोहिमेत आरोग्य यंत्रणेसह, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका व अन्य स्वयंसेवकांचा सहभाग राहणार आहे. यासाठी जिल्ह्यात 1500 आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक केली असून 50 वर्षांपुढील आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांना तसेच अन्य आजार असलेल्यांना या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. यापूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झाली असेल, तसेच त्यांची अॅटीजन तपासणी केली असेल त्यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai