5 फेब्रुवारीला भाजपचे राज्यभर आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2021
- 1151
वीज दरवाढी विरोधात एल्गार
मुंबई : येत्या 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपा आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारच्या कोअर कमिटीमध्ये वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ठरवण्यात आली.
भाजपा कोअर कमिटीची बैठक भाजपच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे सह प्रभारी शिवप्रकाश उपस्थित आहे. अर्थसंकल्पाचा प्रसार प्रचार, आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूक संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपची बैठक झाली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai