मॉलमध्ये शनिवारी-रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2021
- 665
नवी मुंबई ः पालिका महापालिका आयुक्तांनी 8 जून रोजी सुधारित आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार शहरातील सर्व मॉल्स आठवड्याचे सातही दिवस 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वा. च्या मर्यादेत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी व रविवारी मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभ्यागतांची रॅपीड अँटिजेन टेस्ट केल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी चारही मोठ्या मॉलमध्ये ठेवलेल्या अँटिजेन टेस्टींग कॅम्पमध्ये सायं. 4 वाजेपर्यंतच्या सत्रात 2212 नागरिकांची अँटिजेन टेस्टींग करण्यात आलेली आहे.
मॉल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहणे अपेक्षित असल्याने 50 टक्के क्षमता सुनिश्चित करण्यासाठी मॉलमधील सर्व दुकाने एकाच दिवशी सुरू न ठेवता दररोज फक्त 50 टक्के दुकाने सुरू ठेवण्यात येतील. म्हणजेच मॉलमधील पहिल्या दुकानापासून एक दुकान आज व त्या शेजारील दुसरे दुकान उद्या अशाप्रकारे आळीपाळीने सुरू ठेवणे अनुज्ञेय आहे. याचाच अर्थ कोणत्याही सलग दोन दुकानांपैकी एक दुकान आज तर त्या शेजारील दुसरे दुकान उद्या अशा पध्दतीने दुकाने सुरू ठेवणे अनुज्ञेय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी व रविवारी मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभ्यागतांची रॅपीड अँटिजेन टेस्ट केल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार 12 जूनला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील चारही मोठ्या मॉलमध्ये ठेवलेल्या अँटिजेन टेस्टींग कॅम्पमध्ये सायं. 4 वाजेपर्यंतच्या सत्रात 2212 नागरिकांची अँटिजेन टेस्टींग करण्यात आलेली आहे. त्यामध्ये रघुलीला मॉलच्या 2 प्रवेशव्दारांवर 291, सेंटर वन मॉलच्या प्रवेशव्दारावर 44, ग्रँड सेंट्रल मॉलच्या 4 प्रवेशव्दारांवर 1089 तसेच इनॉर्बिट मॉलच्या 3 प्रवेशाठिकाणी 788 अभ्यागतांची अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली आहे. मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या कोव्हीडपासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai