पोलिसांसाठी राज्यस्तरीय नंदा संजीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2021
- 444
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर नं.25 येथील मुळगंध विहार प्रांगणात, सन्मान पोलीस दलाचा- सन्मान पोलीस कार्याचा उद्देश्या अंतर्गत नंदा फाउंडेशन आणि वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, पोलिसांसाठी राज्यस्तरीय नंदा संजीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्था अध्यक्ष स्वप्नील वाडेकर, साहित्यिक विलास देवळेकर, उत्तम तरकसे, प्रताप सिंग राजपूत इत्यादी मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी नंदकुमार वाडेकर आणि ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी वाडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सदर सन्मान राज्यातील विविध 51 पोलीस कुटुंबियांना प्रदान करण्यात आला. पोलीस प्रशासन आणि सामान्य जनता यामध्ये असलेली दरी कमी करण्याचे कार्य प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांना पोलिसांसमवेत सन्मानित करून त्यांच्याप्रती समाजाचे असलेले ऋण व्यक्त करणे, यासाठी राज्यस्तरीय आणि स्थानिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होणे, काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष वाडेकर यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai