घरांचा ताबा देण्यासंदर्भात भूलथापांना बळी पडू नये
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 13, 2021
- 564
नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात संबंधित अर्जदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. तसेच घरांचा ताबा देण्यासाठी सिडकोने कोणत्याही मध्यस्थ संस्था/व्यक्ती किंवा प्रतिनिधीची (एजंट) नियुक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरणही सिडकोकडून देण्यात आले आहे.
सिडकोने कोविड-19 महासाथ व त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण केले व 1 जुलै 2021 पासून यशस्वी अर्जदारांना टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरांचा ताबा देण्यासंदर्भात कोणत्याही व्यक्तिने अथवा संस्थेने कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवल्यास अर्जदारांनी त्यावर विश्वास ठेवू नये. कारण याकरिता कोणत्याही मध्यस्थ संस्था/व्यक्ती किंवा प्रतिनिधीची सिडकोकडून नियुक्ती करण्यात आलेली नाही. योजना पुस्तिकेमध्ये नमूद प्रक्रियेनुसारच घरांचा ताबा देण्यात येत आहे. या संदर्भातील माहितीकरिता अर्जदारांनी केवळ सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, सिडकोचे फेसबुक, युट्यूब व ट्विटर पेज, सिडकोकडून काढण्यात येणारी प्रसिद्धी पत्रके यांवरच विश्वास ठेवावा किंवा सिडको कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या संदर्भात मध्यस्थ किंवा प्रतिनिधी म्हणवणार्या कोणत्याही व्यक्ती वा संस्थेकडून अर्जदारांची फसवणूक झाल्यास सिडको जबाबदार राहणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai