महा रक्तदान शिबिरात 255 रक्तबाटल्या संकलन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2021
- 412
नवी मुंबई : राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी मुंबईमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले.
गणेश नाईक ब्लड डोनर चैन अंतर्गत नवी मुंबईमध्ये रक्तदानाच्या विधायक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस आणि आमदार गणेश नाईक यांचा 15 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस या दोन्ही वाढदिवसाच्या निमित्ताने हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध प्रभागांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता हा अभिनव उपक्रम सुरू राहणार आहे. कोरोना काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता महा रक्तदानाचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी आणि आ. गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai