नवी मुंबईचे खेळाडू राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2021
- 859
राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड
नवी मुंबई ः कर्नाटक स्विमिंग असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ‘37 वी सब ज्युनिअर’ आणि ‘47 वी ज्युनिअर नॅशनल एक्वाटिक चॅम्पिअनशिप’ 2021 या स्पर्धेचे आयाजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नवी मुंबईतील अद्वैत झरांगे, अगस्त्या शर्मा, भाविन तळेकर या तीन जलतरणपट्टंची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर 2021 रोजी बंगळूर येथे होणार आहे.
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये जलतरणाचे प्रशिक्षण घेणार्या अद्वैत झरांगे, अगस्त्या शर्मा, भाविन तळेकर या जलतरणपट्टूंनी स्थानिक तसेच राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कर्नाटक स्विमिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या तत्वावर आयोजित ‘37 वी सब ज्युनिअर’ आणि ‘47 वी ज्युनिअर नॅशनल एक्वाटिक चॅम्पिअनशिप’ 2021 या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यांची निवड झाली आहे. 19 ते 23 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू येथे संपन्न होणार आहे. यामध्ये होणार्या 100 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर आयएम आणि 50 मीटर फ्रीस्टाईल या इव्हेंटसाठी अद्वैत झरांगे, 50 मीटर फ्रीस्टाईलसाठी भाविन तळेकर आणि 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक -, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, 400 मीटर आयएम या इव्हेंटसाठी अगस्त शर्माची निवड झाली आहे. या तीनही खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai