स्वच्छता दूतांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 30, 2021
- 531
पनवेल : दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सव 2021 या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेला बेस्ट सिटीझन लेड इनिशिएटीव ओवरॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे खरे मानकरी पनवेल मधील सर्व स्वच्छता दूत यांचा संविधान दिनानिमित्त विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला.
या पुरस्काराचे खरे मानकरी आपल्या पनवेलमधील सर्व स्वच्छता दूत आहेत त्यांचाच या पुरस्कारामध्ये सिंहाचा वाटा आहे असे प्रितम म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे सर्व सहकारी नगरसेवकांसोबत स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, रविंद्र भगत, ज्ञानेश्वर पाटील, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, प्रीती जॉर्ज, प्रिया भोईर, पालिका अधिकारी, स्वच्छता दूत, कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai