वाशी आरटीओतील अधिकार्यांची विभागीय चौकशी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 25, 2021
- 565
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करुन नोंदी न करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांची विभागीय चौकशी सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
वाशी परिवहन कार्यालयातील दोन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच सात लिपिकांवर करवसूली आणि कर थकबाकीप्रकरणी अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला. अधिकार्यांनी चक्क वार्षिक आणि त्रैमासिक कराची चोरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले होते, मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर अॅड.परब म्हणाले की, मार्च 2019 च्या दरम्यान परिवहन आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता वाशी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण 850 वाहने आक्षेपित करण्यात आली आहेत. या प्रकरणी प्राथमिक दृष्ट्या अनियमितता निदर्शनास आल्याने एकूण 9 अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध परिवहन आयुक्त यांच्या स्तरावरुन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार एकत्रित विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही परब यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai