ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाच्या धर्तीवर उभारणार कल्याणमधील भवन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 28, 2021
- 710
खासदार श्रीकांत शिंदे यांचा मानस
नवी मुंबई ः ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे 5 डिसेंबर रोजी नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबईच्या नावलौकीकात भर घालणारे हे स्मारक सर्वांना भुरळ पाडत आहे. नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाला भेट दिली असून याच धर्तीवर कल्याणमधील आंबडेकर स्मारक उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी कल्याण महापालिकेतील अधिकारी व अभियंत्यांची टिम नवी मुंबईतील स्मारकाला भेट देऊन येथील अभियंत्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण महापालिकेच्या ड प्रभाग समितीच्या नजीक असलेल्या उद्यानाची 8000 चौरस मीटर जागा आहे. त्याच जागेत 1300 चौरस मीटर जागेत आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी होत होती. मात्र या जागेवर आरक्षण असल्याने स्मारक उभे कसे राहणार असा प्रश्न होता. हे आरक्षण बदलण्यात आले असून त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. निविदाद्वारे स्मारकाचे काम लवकर सुरु केले जाणार आहे. हे स्मारक ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या धर्तीवर बांधण्याचा मानस त्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला.
बहुचर्चित असणार्या ऐरोलीतील स्मारकाला नागरिकांसह अनेक राजकर्त्यांनीही भेटी दिल्या आहेत. या भव्यतम स्मारकातील वातानुकूलीत अद्ययावत सभागृह, ध्यान केंद्र, ‘ई लायब्ररी’ सुविधेसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक ऑडिओ सुविधेसह जीवन प्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन, आभासी चलचित्र विशेष कक्ष अशा विविध सुविधांचे लोकार्पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊन हे स्मारक नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथील अत्याधुनिक सोयी सुविधा भेट देणार्या सर्वांनाच आकर्षित करत आहेत. नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाला भेट दिली. नवी मुंबई शहरातीलच नव्हे देशातील एक उत्कृष्ट स्मारक म्हणून नावाजले जाणार्या या स्मारकाच्या धर्तीवरच कल्याणमधील डॉ. आंबेडकर भवन उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai