671 जणांना प्रिकॉशन डोस
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 12, 2022
- 685
नवी मुंबई ः केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देणाबाबत प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार पहिल्याच दिवशी नवी मुंबईतील 671 नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालये आणि तुर्भे येथील माता बाल रुग्णालय त्याचप्रमाणे 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्रिकॉशन डोस उपलब्ध करून दिले होते. सकाळपासूनच प्रिकॉशन डोस घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर लाभार्थ्यांचा उत्साह दिसून आला. कोव्हीडचा दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झालेल्या म्हणजेच ज्यांनी 12 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला असेल अशा आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यात आला. यामध्ये 299 आरोग्यकर्मी, 206 पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच 166 सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनी प्रिकॉशन डोस घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai