उरणमध्ये दोन दिवसांची पाणीकपात
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 12, 2022
- 988
उरण ः रानसई धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन उरणमधील एमआयडीसीचे उपअभियंता रवींद्र चौधरी यांनी केले आहे. त्यासाठी मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रानसई धरणातून सध्या उरण नगरपालिका, तालुक्यातील 21 गावे, ओएनजीसी, जीटीपीएस या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. धरणाची उंची ही 120 फूट असली तरी पाण्याची पातळी ही 116.5 फुटावर आहे. सध्या पातळी 108 फुटापर्यंत खाली आली आहे. धरणातून दिवसभरात 40 एमएलडी पाणी पुरवठा होतो. याशिवाय एमआयडीसी सिडकोच्या हेटवणे धरणातून 10 एमएलडी पाणी घेत आहे. भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून आतापासूनच आठवड्यातून दोन दिवस मंगळवार, शुक्रवारी पाणीकपात करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai