कोकण विभागात बुस्टर डोसची संख्या अधिक
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 20, 2022
- 430
नवी मुंबइ : ओमायक्रॉन या कोविड-19 च्या नवीन व्हेरीएंटच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र दि.10 जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागात आत्तापर्यंत 68 हजार 828 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. सर्वात जास्त ठाणे जिल्हयातील 43 हजार 658 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
कोकण विभागात सद्या लसीकरण वेगाने सुरु आहे. सर्व नागरिकांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. दक्षिण अफ्रिकेत उदयास आलेल्या ओमायक्रॉन या कोविड-19 च्या नव्या व्हेरिएंटचा प्रादूर्भाव सर्वत्र झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्हयातील सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना युध्दपातळीवर बुस्टर डोस देण्याचे काम चालू आहे. ठाणे जिल्हयात 43 हजार 658, रायगड जिल्हयात 9 हजार 884, रत्नागिरी जिल्हयात 6 हजार 419 तर पालघर जिल्हयात 8 हजार 867 असे कोकण विभागात एकूण 68 हजार 828 नागरिकांनी आत्तापर्यंत बुस्टर डोस घेतला आहे.
आरोग्य कर्मचारी, कोविड योध्दे, 60 वर्षावरील नागरिक यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले असतील व दुसर्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण केले असतील, त्यांनाच तिसरा डोस देण्यात येत आहे. 60 वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देतांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लसीकरण केले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai