मार्चअखेर एमआयडीसीला मिळणार ‘अमृत’
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2022
- 738
25 कोटींचे उत्पन्न पुनर्चक्रिकरण प्रकल्पातून अपेक्षित
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून नवी मुंबई महापालिकेसाठी मंजूर झालेला पाण्याच्या पुनर्चक्रिकरणाचा प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. 20 एमएलडी क्षमतेचा कोपरखैरणे येथील प्रकल्प पुर्ण झाला असून ऐरोली येथील प्रकल्प 31 मार्च रोजी पुर्ण होऊन दोन्ही प्रकल्पातून एमआयडीसीला 40 एमएलडी पाणी पुरवले जाणार आहे. यामुळे पालिकेला वार्षिक 25 कोटींचे उत्पन्न मिळणार असून शासनाला 40 एमएलडी पाणी इतर भागाला पुरवणे शक्य होणार आहे. असा प्रकल्प उभारणारी नवी मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज 420 एमएलडी पाणी वापरले जात असून त्यावर सीबीआर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करुन ते पाणी खाडीत सोडले जाते. या वाया जाणार्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन या पाण्यावर प्रक्रिया करुन ते एमआयडीसीला वापरण्यासाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यास सांगितला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत मंजूरीसाठी राज्य सरकारने पाठवला होता. या प्रकल्पास 160 कोटींचा सर्व साधारण खर्च अपेक्षित असून केंद्र सरकारकडून 130 रुपये अनुदान मिळणार आहे. ठाणे-बेलापुर औद्योगिक पट्ट्यात एमआयडीसीकडून दररोज 200 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. या प्रकल्पामुळे एमआयडीसीच्या 40 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. जे औद्योगिक कारखाने या प्रकल्पातील पाण्याचा वापर करतील त्यांना कर सवलत देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे.
2019 साली सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम जवळजवळ पुर्ण झाले असून रेल्वे क्राँसिंग करण्यासाठी संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे पाईपलाईनचे काम पुर्ण होणार आहे. यामध्ये कोपरखैरणे येथील 100 एमएलडी आणि ऐरोली येथील 80 एमएलडी पाण्यापैकी 40 एमएलडी पाण्यावर पुनर्चक्रिकरण प्रर्क्रिया करुन ते एमआयडीसीला देण्यात येणार आहे. पाण्याच्या पुनर्चक्रिकरणासाठी सँड फिल्टरेशन ऐवजी अल्ट्रा फिल्टरेशन पद्धतीने पाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने पाण्याचा दर्जा उच्च राहणार आहे. या पद्धतीचे छोटे प्रकल्प अनेक खाजगी गृहसंकुलात कार्यान्वित आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. या प्रकल्पातून मिळणार्या उत्पन्नाबरोबर त्याचा पर्यावरणावरही पडणारा ताण कमी होणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा त्यामुळे रोवला जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai