शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2022
- 1149
उरण ः उरण तालुक्यातील करंजा येथील रा.जि.प. प्राथमिक शाळा कोंढरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त माजी विद्यार्थी इयत्ता 7 वी वर्ष 2010-11 यांच्या वतीने प्राध्यापक आणि शाळा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला होता. तसेच शाळा कमिटी व शिक्षकांनी सुद्धा सहभाग दाखवला. उत्तीर्ण स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ असे चित्रकलेचे साहित्य व आकर्षक ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता अनेक माजी विध्यार्थी संघ वेगवेगळ्या ठिकाणी व पर्यटन स्थळी जाऊन आपले गेट टू गेदर सारखे कार्यक्रम करत असतात. मात्र सदर माजी विद्यार्थ्यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावी या उद्देशाने माजी विद्यार्थी इयत्ता 7 वी वर्ष 2010-11 यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शाळेचे प्रा. मच्छिंद्र म्हात्रे यांनी आपल्या संभाषणातून अश्याच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांकडून व्हावे असे मत मांडले. चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शिक्षकवर्ग आणि शाळा कमिटीने माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai