संत निरंकारी मिशनच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2022
- 854
उरण ः रविवार दि. 03 एप्रिल 2022 रोजी पिरकोन गाव, सेक्टर 19 विंधने उरण, झोन मुंबई 39 च्या संत निरंकारी मिशनच्या सर्व सदस्यांनी पिरकोन गाव येथे स्वछता अभियान कार्यक्रम राबविले. या स्वछता अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला.
संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आदेशानुसार मिशनच्या सर्व सेवादल व सदस्यांनी उरण तालुक्यातील पिरकोन गावात स्वछता अभियान राबवून संपूर्ण पिरकोन गावाची स्वछता केली. या अभियानात संत निरंकारी मिशन मधील बुजुर्ग पुरुष महिला, नवतरुण, सदस्यांसह लहान मुलांचा ही सहभाग होता. या स्वछता अभियानात प्राथमिक व माध्यमिक शाळा परिसर, तलाव, रस्ते, आदिची साफसफाई करण्यात आली. या अभियानाचे उदघाटन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रमाकांत जोशी, दहा गाव माजी विद्यार्थी संघटनाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, संतोष गावंड, विनायक पाटील, सुधीर गावंड, बारकानाथ जोशी,हरेंद्र गावंड, सुरेंद्र गावंड,नितीन गावंड,आम्ही पिरकोनर ग्रुपचे अध्यक्ष चेतन गावंड, संतोष मोकळ,हरिभाऊ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. संत निरंकारी मिशनच्या वतीने संयोजक दत्ताराम पाटील, क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर, सेवादल इंचार्ज समाधान गावंड, संजय गायकवाड, प्रकाश म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, रविंद्र मढवी,सचिन पाटील, अनंत शेनॉय, सुरेश कोळी, रुपेश ठाकूर, रुपाली कोळी उपस्थित होते. उपस्थित सर्व सदस्यांसाठी शेवटी स्नेहभोजन(लंगर)चे आयोजन संत निरंकारी सत्संग पिरकोनच्या वतीने करण्यात आले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai