नवी मुंबईतील 475 इमारती धोकादायक
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 21, 2022
- 534
संरचनात्मक परिक्षण अहवाल 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
नवी मुंबई ः स्मार्ट सिटी असणार्या नवी मुंबई शहरातील 475 इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने घोषित केले आहे. पालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सन 2021-22 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली आहे. 30 वर्षा पेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होवून 30 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परिक्षण करून घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षा पेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजवयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पुर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे. या प्रकारे संरचना परिक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था/ मालक/ भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25,000 अथवा सदर मिळकतीचे वार्षिक मालमत्ताकराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतुद महाराष्ट्र महापालिका कायद्यात अंतर्भूत करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परिक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. 30 वर्षा पेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण 30 सप्टेंबर 2022 पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे.
यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा सी-1 प्रवर्गामध्ये मोडणार्या 65 इमारती, इमारत रिकामी करून संचरचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 ए प्रवर्गामध्ये मोडणा-या 94 इमारती, इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 बी प्रवर्गामध्ये मोडणा-या 259 इमारती तसेच इमारतीची किरकोळ दुरूस्ती अशा सी-3 प्रवर्गामध्ये मोडणा-या 57 इमारती, अशाप्रकारे एकूण 475 धोकादायक इमारतींचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai