गर्भपाताची औषधे विक्री केल्याने अॅमेझॉनवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2022
- 850
अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही
मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल वर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रीस्क्रीपशन चढझ ज्ञळीं या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती.
अॅमेझॉन.इन या ऑनलाईन पोर्टल वर Aअ-घरीश या ब्राँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. या औषधाची मागणी अॅमेझॉन.इन द्वारे डॉक्टरांचे प्रीस्क्रीपशनची मागणी न करता स्वीकारली गेली व हे औषध कुरियरने प्राप्त झाले. या कुरियर पार्सल सोबत औषध विक्रीचे बिल प्राप्त झाले नाही. या औषधाच्या विक्री प्रकरणात प्रशासनाने अॅमेझॉनसेलर्स सर्विसेसला माहिती विचारणा केली असता या औषधे ओरिसा येथून पुरवठा करण्यात आल्याचे कळविण्यात आले. अॅमेझॉनने पुरविलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासात ओरिसा येथील विक्रेत्याने सदर औषध पुरविले नसून त्याचे औषध विक्री दुकानाचे कागदपत्रे वापरून सदर औषध विक्रीसाठी इतर व्यक्तीने अॅमेझॉनच्या ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी केली असल्याचे आढळून आले.
चढझ ज्ञळीं हे औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 व नियमांतर्गत अनुसूची क प्रवर्गातील औषध असून त्याची विक्री केवळ पंजीकृत वैद्यकीय व्यवसायिकाच्या प्रीस्क्रीपशन वरच करणे बंधनकारक आहे. अॅमेझॉन.इन या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार्या वस्तूच्या यादीत औषधे घटक अंतर्भूत नाही. या प्रकरणात अॅमेझॉनने त्यांच्या माध्यमातून औषधे विक्री करण्यास नोंदणी करणार्या संस्था/व्यक्ती यांची शहानिशा केली नाही. अॅमेझॉन.इन या ऑनलाईन पोर्टल वर सदर विक्रेत्याने चढझ ज्ञळीं या गर्भपातासाठी वापरत येणार्या औषध प्रकारचे नाव न देता ब्रांड नावाने विक्रीसाठी नोंदणी केली. औषधांच्या विक्रीसाठी प्रचलित कायदे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे या बाबत खात्री अॅमेझॉनद्वारे करण्यात आली नाही. डॉक्टरांच्या प्रीस्क्रीपशन शिवाय ज्या औषधांची विक्री करणे रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे अश्या गर्भपाताच्या औषधाची सर्हास विना प्रीस्क्रीपशन विक्री अॅमेझॉनद्वारे केली गेली आहे. त्यामुळे अॅमेझॉन.इन या ऑनलाईन विक्री पोर्टल व संबंधित विक्रेत्याविरुद्ध खेरवाडी पोलीस स्टेशन बांद्रा (पूर्व) येथे विविध कलमाखाली 29 एप्रिल 2022 रोजी औषध निरीक्षक (गुप्तवार्ता )मुख्यालय द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांद्वारे करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai