सोलर विजेला आता सरकारी अनुदान
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2022
- 690
मुंबई : सध्या देशात विजेचं संकट गंभीर बनलं आहे. एकीकडे कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे; मात्र दुसरीकडे सध्या विजेच्या मागणीतदेखील मोठी वाढ झाली आहे. विजेचं उत्पादन कमी आणि मागणी जास्त वाढल्याने वीजकपातीचा सामना करावा लागत आहे; परंतु सामान्यजन सौर ऊर्जेच्या माध्यमातून या वीज संकटावर सहज मात करू शकतात. घरावर सोलर पॅनल बसवून त्याच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करू शकता. सोलर पॅनलपासून निर्माण होणारी ही वीज गरज पूर्ण करू शकते.
सरकारकडूनदेखील सोलर पॅनल बसवण्यासाठी मदत केली जात आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येतो, केंद्र सरकार त्यासाठी किती अनुदान देतं, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. एका दिवसात किती वीज लागू शकते, किती विद्युत उपकरणं आहेत यावरून किती विजेची गरज लागणार आहे, याचा हिशेब करून किती क्षमतेचे सोलर पॅनेल बसवायचे हे निश्चित करता येतं. दोन ते तीन फॅन, एक फ्रिज, सहा ते सात एलईडी बल्ब आणि टीव्ही एवढी विद्युत उपकरणं असल्यास दिवसभरात सहा तेआठ युनिट वीज लागू शकते. त्यानुसार घरावर बसवण्यात येणार्या सोलर पॅनलची किंमत निश्चित करता येते.
केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सोलर रूफ टॉप योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जातं. सर्वप्रथम सोलर पॅनल खरेदी करून घरावर बसवल्यानंतर अनुदानासाठी अर्ज करता येतो. घरावर तीन किलोवॉटचं सोलर पॅनल बसवल्यास सरकार चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देतं. घरावर दहा किलोवॉटचं सोलर पॅनल बसवल्यास सरकार त्यावर वीस टक्के अनुदान देतं.
घरावर दोन किलोवॉटचं सोलर पॅनल बसवण्यासाठी एक लाख वीस हजारांच्या जवळपास खर्च येतो; मात्र त्यावर चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं. म्हणजेच दोन किलोवॉटच्या सोलर सिस्टीमसाठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा घरावर सोलर पॅनल बसवल्यास पुढील 25 वर्षं वीजबिलापासून सुटका होऊ शकतेतसंच घरात चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai