विमानतळ नामकरणासाठी 24 जूनला सिडकोला घेराव
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 22, 2022
- 502
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही असून त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात येत आहे. याच मागणीसाठी दि.बा.पाटील यांच्या 9 व्या स्मृतिदिनी 24 जून रोजी प्रकल्पग्रस्त सिडकोला घेराव घालणार असल्याची माहिती विमानतळ नामकरण सर्व पक्षीय समितीने पत्रकार परिषदेत दिली.
गेली दोन वर्षे विमानतळाच्या नामकरणाचा वाद सुरू आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार सिडकोने मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे. गेल्या वर्षी प्रकल्पग्रस्तांनी याच दिवशी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर कोरोना काळात हा लढा काहीसा शिथिल झाल्याचे बोलले जात असतानाच आता पुन्हा हा आग्रह वाढला आहे. लवणकार (आगरी) समाजातील निवडक प्रतिनिधींचे एक संमेलन नुकतेच दिल्लीतील राजा राममोहन मेमोरियल सभागृहात झाले. या संमेलनात दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा ठराव संमत करण्यात आला असून या नामकरणासाठी पावसाळ्यानंतर दिल्लीतही आंदोलन उभारण्याचा इशारा या वेळी या समाजाने दिला आहे.
24 जून रोजी सिडकोला शांततेच्या मार्गाने हजारोंच्या उपस्थितीत घेराव घालण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समिती समन्वयक मनोहर पाटील यांनी दिली. दि.बा पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिलाच, शिवाय अनेक कामे केलेली आहेत. त्यामुळे सरकाने जनमताचा आदर करीत ही मागणी पूर्ण करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी अपेक्षा माजी खासदार संजीव नाईक यांनी या वेळी व्यक्त केली. 28 एप्रिल 2021 सिडकोने पारित केलेला प्रस्ताव विखंडित करून दि.बा.पाटील यांचे नामकरण होऊ शकते. मात्र सिडको आडमुठी भूमिका घेत असल्याने सिडकोवर हा घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे समन्वयक डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले. या वेळी मुख्य कृती समितीचे माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष संतोष केणे, मुख्य समन्वयक दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, शैलेश घाग आदी समिती सदस्य उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai