रायगडमधील पर्यटन विकासाला 20 कोटी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 02, 2022
- 762
अलिबाग : मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्याआधी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शेवटच्या दिवशी रायगड जिल्ह्यासाठी ‘प्रादेशिक पर्यटन विकास’ ही योजना घोषित करत 20 कोटी 37 लाख रुपये निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली; तर 16 कोटी 22 लाखांचा निधी वितरितही केला.
ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, तसेच विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे. महाविकास आघाडीची शेवटची कॅबिनेट बैठक बुधवारी झाली. यामध्ये राज्यातील विविध कामांना मंजुरी देण्यात आली. तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या तालुक्यांतील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.
‘प्रादेशिक पर्यटन विकास’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्यासाठी 20 कोटी 37 लाख रुपये निधी मंजूर करण्यात यश मिळाले आहे. यापैकी 16 कोटी 22 लाख रुपये निधी शासनाकडून वितरितही करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र, ही कामे मंजूर करण्यात समतोल राखला नसल्याचे दिसून येत आहे. यात अदिती तटकरे ज्या मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व करतात, त्या श्रीवर्धन तालुक्याला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.
शेवटच्या दिवशी रायगडला काय मिळाले?
- कुडा लेणी - तळा, (प्रशासकीय मान्यता - 2 कोटी रुपये, वितरित - 1 कोटी 50 लाख रुपये)
- देवकुंड- माणगाव, (प्रशासकीय मान्यता - 2 कोटी रुपये, वितरित - 1 कोटी 50 लाख रुपये)
- श्रीवर्धन समुद्र किनारा (प्रशासकीय मान्यता - 1 कोटी, वितरित- 60 हजार)
- श्रीवर्धन पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण (प्रशासकीय मान्यता - 25 लाख, वितरित - 25 लाख),
- श्रीवर्धन नगरपरिषद इमारत नूतनीकरण (प्रशासकीय मान्यता - 12 लाख 75 हजार, वितरित - 12 लाख 75 हजार)
- श्रीवर्धन-डांबरीकरण (प्रशासकीय मान्यता - 74 लाख 42 हजार, वितरित - 52 लाख), (पान 5 वर)
- श्रीवर्धन-भुवनाळे तलाव (प्रशासकीय मान्यता- 49 लाख 96 हजार, वितरित - 49 लाख 96 हजार),
- श्रीवर्धन- जिवनेश्वर कुंडाचे नूतनीकरण (प्रशासकीय मान्यता - 49 लाख 9 हजार, वितरित रु.49 लाख 9 हजार),
- म्हसळा- सीसी टीव्ही बसविणे (प्रशासकीय मान्यता - 1 कोटी 64 लाख 91 हजार, वितरित - रु.1 कोटी 15 लाख),
- म्हसळा-जासई नदीकिनारा सुशोभीकरण (प्रशासकीय मान्यता - 5 कोटी, वितरित - 4 कोटी)
- दिवेआगार- केदारलिंग भैरव मंदिर सभामंडप (प्रशासकीय मान्यता - 69 लाख 36 हजार, वितरित - 69 लाख 36 हजार)
- दिवेआगार- सिद्धनाथ भैरव मंदिर सभा मंडप (प्रशासकीय मान्यता - 69 लाख 36 हजार, वितरित- 69 लाख 36 हजार)
- देवखोल- कुसुमेश्वर मंदिर विकास (प्रशासकीय मान्यता - 1 कोटी, वितरित रक्कम- रु. 70 लाख),
- रोहा - शिवसृष्टी सुशोभीकरण (प्रशासकीय मान्यता - 1 कोटी 78 लाख, वितरित - रु.1 कोटी 50 लाख)
- रोहा- शिवसृष्टीमध्ये शिल्प तयार करणे (प्रशासकीय मान्यता - 2 कोटी 45 लाख, वितरित- 2 कोटी)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai