सुरक्षा रक्षकांना न्याय द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 11, 2022
- 724
- वेतन वेळेवर मिळावे, लेव्ही कमी करण्याची मागणी
- सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांचे कामगार आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र
नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे निवड करुन मुंबई व ठाणे मंडळामार्फत विविध आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक पुरवले जातात. मात्र मुंबई-ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना गेल्या 2-3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. याप्रकरणी सुरक्षारक्षकांना वेळेवर वेतन मिळावे तसेच 42 टक्के स्विकारली जाणारी लेव्ही कमी करुन त्यांना न्याय देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी पत्राद्वारे राज्याच्या कामगार आयुक्त व मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळ मुंबई व ठाणे विभागामार्फत मागणीनुसार ते विविध आस्थापनांना सुरक्षारक्षक पुरवले जातात. विविध आस्थापनाकडून प्राप्त पगाराच्या एकूण 42 टक्के लेव्ही (नोकरीच्या बदल्यात वेतनातून कमिशन) ही सुरक्षा रक्षक मंडळाकडून आकारली जाते. वस्तुतः मंडळ लेव्ही घेत असल्याने सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर देण्याची जबाबदारी मंडळाची आहे. मात्र असे असले तरी मुंबई-ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना गेल्या 2-3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. सुरक्षारक्षकांच्या समस्यांविषयी सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी कामगार आयुक्त व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून सुरक्षारक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. सुरक्षारक्षकांच्या म्हणण्यानुसार मिळणारा गणवेश, रेनकोट, शूज यांचा दर्जा प्रश्नांकित असून आर्थिक गैरप्रकार, बदल्यांसाठी पैशांची मागणी, तक्रार केली तर काळ्या यादीत टाकणे आदींबाबतही पत्रात नमुद केले आहे.
- एकच बोर्ड असावे
राज्यातील 14 सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण, विलनीकरण करून राज्य पातळीवर एकच बोर्ड निर्माण करून त्यावर सचिव व आयुक्त दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती करत राज्यातील लाखो सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याची मागणी दाणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai