पालिकेच्या 120 कर्मचार्यांना पदोन्नती
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 19, 2022
- 601
नवी मुंबई ः विविध पुरस्कारांनी नवी मुंबई महानगरपालिका सन्मानित होत असताना त्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या कामाचे महत्वाचे योगदान आहे. या अनुषंगाने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पदोन्नती समितीने शिफारस केल्यानुसार वरिष्ठ लिपिक, कर निरीक्षक पदावर कार्यरत 30 कर्मचार्यांना सेवा जेष्ठतेनुसार अधिक्षक/वसुली अधिकारी या पदावर तसेच लिपिक-टंकलेखक पदावर कार्यरत असलेल्या 90 कर्मचार्यांना सेवा जेष्ठतेनुसार वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
मागील बर्याच वर्षांपासून हे कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे 120 कर्मचार्यांना पदोन्नतीचा अपेक्षित लाभ मिळाल्याने कर्मचार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोरोना काळात कोव्हीडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह निधी देणे, कोव्हीड काळात कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांना विशेष कोव्हीड भत्ता देणे असे महत्वाचे कर्मचारी कल्याणकारी निर्णय आयुक्तांनी घेतले. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न समजून घेऊन ते तत्परतेने मार्गी लावण्याच्या दृष्टीने नियोजन केले. पदोन्नती समितीला कार्यवाहीसाठी कालमर्यादा निश्चित करून देऊन आयुक्तांनी त्याचा सातत्याने आढावा घेतला. त्यामुळे मागील दीड वर्षात 33 संवर्गात 290 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ पदांपासून संवर्ग 4 च्या पदांपर्यंत सर्व संवर्गांना उचित न्याय मिळेल याची दक्षता घेण्यात येत आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रामुख्याने आया, वॉर्डबॉय, प्लंबर, फिटर अशा वर्ग 4 मधील कर्मचार्यांच्या पदोन्नतीकडे विशेष लक्ष देण्यात आले. पदोन्नतीमध्ये आरोग्य, स्वच्छता, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन, प्रशासकीय सेवा अशा विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांना न्याय देण्यात आला. मागील दीड वर्षात उपआयुक्त पदावर 3, सहाय्यक आयुक्त पदावर 6, कार्यकारी अभियंता पदावर 6, लेखाधिकारी पदावर 3, अग्निशमन केंद्र अधिकारी पदावर 2 पदोन्नत्या झालेल्या आहेत. पदोन्नत्यांमध्ये आज लिपिक-टंकलेखक पदावरून वरिष्ठ लिपिक, कर निरीक्षक पदावर झालेल्या 90 तसेच वरिष्ठ लिपिक, कर निरीक्षक पदावरून अधिक्षक/वसुली अधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या 90 अशा 120 कर्मचार्यांच्या पदोन्नत्या या एका संवर्गातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पदोन्नत्या आहेत. यापूर्वी स्टाफ नर्स संवर्गातून 41 कर्मचार्यांच्या सिस्टर इंचार्ज पदावर सर्वाधिक पदोन्नत्या झालेल्या होत्या. त्याखालोखाल अधिक्षक पदावर 23 कर्मचार्यांच्या प्रशासकीय अधिकारी पदावर तसेच 22 उपस्वच्छता निरीक्षकांच्या स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नत्या झालेल्या आहेत. याशिवाय 33 संवर्गातील 372 अधिकारी, कर्मचारी यांना 3 लाभांची सुरक्षित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai