सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2022
- 694
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सूनावणीला तारीख पे तारीख मिळत आहे. याविषयावर आज होणारी सुनावणी उद्यावर म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळं सत्ताधार्यांची धाकधुक वाढली आहे.
राज्यातल्या सत्तासंघर्षावरील आज (22 ऑगस्ट) होणारी सुनावणी आता उद्या (23 ऑगस्ट) होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या आजच्या अनुपस्थितीमुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी 4 ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसर्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका पुढील सुनावणीसाठी घटनापीठाकडे सोपवणार का याचा निर्णय न्यायालयात होणार आहे. सदरील सर्व याचिकांवर सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai