वाशीत मत्सव्यवसायविषयी मार्गदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2022
- 698
नवी मुंबई ः खाडीकिनारा लाभलेल्या नवी मुंबईत मासेमारी हा मुळ व्यवसाय असून अद्यापही येथील अनेक स्थानिक भुमीपुत्र मासेमारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. वाशी गावच्या मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.ए.आर.-सी.आय.एफ.टी.च्या मुंबई रिसर्च सेंटर (एम.आर.सी) तर्फे जागतिक मत्सव्यवसाय दिवस नुकतास साजरा करण्यात आला. यावेळी वैज्ञानिक श्रवण कुमार शर्मा यांनी पर्यावरण आणि मानवी आरोग्य, शाश्वत मासेमारी याविषयावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
नवी मुंबईची वाटचाल स्मार्ट सिटीकडे असली तरी अजूनही येथील मुळ असलेलल्या मासेमारी या व्यवसायाशी स्थानिकांची नाळ अजूनही जोडलेली आहे. दिवाळे, वाशी, घणसोली, नेरुळ, बेलापुर येथील मुळ गावात अनेक कुटुंबांचा मासेमारी हाच व्यवसाय आहे. नुकताच झालेला जागतिक मत्सव्यवसाय दिवस वाशीतील मच्छीमार संस्थेने साजरा केला. वाशी गावच्या मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.ए.आर.-सी.आय.एफ.टी.च्या मुंबई रिसर्च सेंटर (एम.आर.सी) तर्फे 17 नोव्हेंबर 2022 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाची थीम ‘संकल्प से सिद्धी’ ही असून एम.आर.सी, आयसीएआर-सीआयएफटीच्या प्रभारी वैज्ञानिक व प्रधान वैज्ञानिक, यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश सुतार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ग्रीष्मा एस एस (वैज्ञानिक) यांनी उपस्थितांना उत्स्फूर्त स्वागतपर भाषणाने संबोधित केले आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आय.सी.ए.आर - सी.आय.एफ.टी.च्या भूमिकेबद्दल त्यांनी माहिती दिली. वाशी गावच्या सुमारे 100 मच्छिमार महिलांच्या सहभागामुळे या मोहिमेला मोठे यश मिळाले. वैज्ञानिक श्रवण कुमार शर्मा यांनी पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर प्लास्टिक आणि घोस्ट मासेमारीच्या हानिकारक परिणामांवर प्रकाश टाकला आणि शाश्वत मासेमारीच्या उपकरणाच्या वापरातील प्रगतीची माहिती दिली. डॉ. रेहाना राज, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, आय.सी.ए.आर.-सी.आय.एफ.टी. ने सागरी अन्नाच्या मूल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचे वर्णन केले आणि मच्छिमार समुदायाचे उत्पन्न वाढविण्याच्या भूमिकेवर जोर दिला. तसेच यावेळी मच्छिमार महिलांनी उपजिवीका सुधारण्यासाठी माशांच्या मूल्यवर्धनात रस व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai