नववर्षाच्या प्रारंभी 2220 वाहनचालकांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2023
- 581
नवी मुंबई ः 2022 या वर्षाला निरोप देऊन 2023 चे दणक्यात स्वागत करण्यात आले. 31 डिसेंबरच्या रात्री विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांकडून व वाहतुक विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. यावेळी नियमांचे उल्लंघन करणार्या 2220 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर लक्ष ठेवण्यासाठी 30 डिसेंबरपासूनच पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त होता. यात विशेषतः मद्य प्राशन करून वाहन चालविणार्या वाहन चालकांवर त्यांचे विशेष लक्ष असते. नवी मुंबईत नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नाही. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान लावण्यात आलेल्या बंदोबस्तात 16 वाहतूक शाखेकडून केलेल्या कारवाईत विना हेल्मेट 489, सिटबेल्ट न लावलेले 135, सिग्नल तोडणारे 67, व इतर एक हजार 529 अशा एकूण 2 हजर 220 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यात तब्बल 160 जणांवर ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली.
नवी गेल्या वर्षी 44 जणांवर ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई करण्यात आली. तर 2021-22 मध्ये गेल्या वर्षीही निर्बंध असताना 27 मद्यपीचालकांवर कारवाई करण्यात आली होती. तर 2018 -19 मध्ये 340 तर 2018-19 मध्ये 353 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai