पुनर्वसनासाठी साफसफाई करुन प्रशासनाचा निषेध
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2023
- 434
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची अनोखी मोहिम
उरण ः शासन विस्थापितांचे गेली 38 वर्ष पुनर्वसन करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. आपल्या भूमिकेचा एक भाग म्हणून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जुना शेवा कोळीवाडा गावात 8 जानेवारी 2023 पासून सफासफाई करून शासनाचा निषेध केला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा साफसफाईचा कार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ग्रामस्थ जुना शेवा कोळीवाडा गावात ठाण मांडून बसणार आहेत. हनुमान कोळीवाडा गावातील पारंपारीक मच्छिमारांना सुप्रिम कोर्टाने नुकसान भरपाई देण्याची आदेश दिल्यामुळे मच्छिमाराची आर्थिक परीस्थिती सुधारली असल्याने मूळ शेवा कोळीवाडा गावात ग्रामस्थ स्वखर्चाने हक्काची घरे बांधून कायमचे शेवा कोळीवाड्यात राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थ गावात साफसफाईची मोहिम राबवून शासनाचा निषेध करणार आहेत. 8 जानेवारीला राबविलेल्या साफसफाई मोहिमेवळी कोणातीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवू नये यासाठी पोलासांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai