5 वर्षांच्या बालकाला बोन मॅरो ट्रान्सप्लांटने नवजीवन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 28, 2026
- 38
कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे यश; टार्गेटेड इम्युनोथेरपीनंतर हॅप्लोआयडेंटिकल ट्रान्सप्लांट
नवी मुंबई : रीलॅप्स्ड ल्युकेमियाने ग्रस्त असलेल्या रांची येथील पाच वर्षांच्या बालकावर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई येथे यशस्वी उपचार करण्यात आले. कॅन्सर पुन्हा बळावल्यानंतर इतर ठिकाणी उपचारांचे पर्याय संपल्याचे सांगण्यात आलेल्या या बालकावर टार्गेटेड इम्युनोथेरपीनंतर हॅप्लोआयडेंटिकल (हाफ-मॅच) बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले. उपचारानंतर बालकाची प्रकृती सुधारली असून त्याला घरी पाठविण्यात आले आहे.
कन्सल्टंट हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, बीएमटी व सेल्युलर थेरपीज तज्ज्ञ डॉ. कुणाल गोयल यांच्या नेतृत्वाखाली ही उपचारपद्धती राबविण्यात आली. बालकाला वयाच्या पाचव्या वर्षी पायांवर निळे डाग आणि मानेजवळ सूज आल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला ‘फिलाडेल्फिया क्रोमोसोम-पॉझिटिव्ह बी-सेल अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’ असल्याचे निदान झाले. तपासणीत 1 म्युटेशन आणि मोनोसोमी-7 हे आनुवंशिक बदलही आढळून आले. यापूर्वी बालकावर अनेक फेऱ्यांची केमोथेरपी, टार्गेटेड औषधोपचार तसेच मेंदूपर्यंत कॅन्सरचा प्रसार रोखण्यासाठी रेडिएशन उपचार करण्यात आले होते. मात्र, उपचारांनंतरही शरीरात कॅन्सरचे काही अंश शिल्लक राहिले. त्यानंतर अधिक तीव्र उपचार आणि सुमारे सहा महिन्यांची मेंटेनन्स केमोथेरपी करण्यात आली. मात्र, त्यानंतर रक्तातील पेशींची संख्या झपाट्याने कमी झाली आणि बोन मॅरो तपासणीत ल्युकेमिया पुन्हा झाल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर बालकाला कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई येथे आणण्यात आले. डॉ. गोयल यांच्या देखरेखीखाली प्रथम विशेष टार्गेटेड इम्युनोथेरपी देण्यात आली. या उपचाराला प्रतिसाद मिळाल्यानंतर कॅन्सरचे प्रमाण अत्यल्प पातळीवर आले. त्यानंतर कुटुंबातील अर्ध्या जुळणाऱ्या दात्याकडून बोन मॅरो घेऊन हॅप्लोआयडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले. उपचारादरम्यान बालकाला काही गंभीर गुंतागुंतींचाही सामना करावा लागला. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्याला तीव्र ताप आला. रक्त चढविताना गंभीर ॲलर्जिक रिएक्शन, श्वास घेण्यास त्रास आणि आतड्यांचा संसर्ग अशा समस्या निर्माण झाल्या. मात्र, पीडियाट्रिक टीम, बीएमटी टीम आणि क्रिटिकल केअर विभागाच्या समन्वयातून या गुंतागुंतींवर तातडीने उपचार करण्यात आले.
डॉ. कुणाल गोयल म्हणाले, “बालक आमच्याकडे आले तेव्हा त्याचा कॅन्सर पुन्हा परतला होता. इम्युनोथेरपीद्वारे कॅन्सर नियंत्रणात आणल्यानंतर सुरक्षितपणे हॅप्लोआयडेंटिकल ट्रान्सप्लांट करणे हे मोठे आव्हान होते. बीएमटी युनिटपासून क्रिटिकल केअरपर्यंतच्या संपूर्ण मल्टी-स्पेशालिटी टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे उपचार यशस्वी झाले. बालकाला निरोगी अवस्थेत घरी जाताना पाहणे हा आमच्यासाठी समाधानाचा क्षण आहे.
पीडियाट्रिक्स अँड निओनेटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा अरोसकर यांनी सांगितले की, लहान मुलांमधील ल्युकेमियाच्या उपचारासाठी विशेष कौशल्य आणि प्रत्येक गुंतागुंतीवर तातडीने उपचार करण्याची क्षमता आवश्यक असते. पीडियाट्रिक आणि हेमॅटोलॉजी ट्रान्सप्लांट टीमच्या समन्वयातून या बालकाच्या उपचारातील आव्हानांवर मात करण्यात आली.हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. शशिकांत पवार म्हणाले, “नवी मुंबईत अत्याधुनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि सेल्युलर थेरपीची सुविधा विकसित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना अशा उपचारांमधून प्रोत्साहन मिळते. हॅप्लोआयडेंटिकल ट्रान्सप्लांट आणि - थेरपीसारख्या आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai