ओरिएंटलच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 20, 2023
- 551
नवी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील विठ्ठल दांतस विधी कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूठ कोर्ट स्पर्धेत ओरिएंटल विधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. या स्पर्धेमध्ये ओरिएंटल विधी कॉलेजचे विद्यार्थी केशव भारद्वाज, रोहित पांडे व श्वेता पटेल या तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांना पहिले व तिसरे उत्तेजनार्थ पारितोषक देऊन गौरवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील अनेक विधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नवी मुंबईतील ओरिएंटलच्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषक देऊन गौरवण्यात आल्याने ओरिएंटल विधी कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai