जेएनपीटी समुद्र मार्गाचे चॅनेल बंद आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 26, 2023
- 652
उरण : उरण तालुक्यात जेएनपीटी (जेएनपीए) प्रकल्प उभे राहताना शेवा कोळीवाडा गावातील जमीन संपादित करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांचे उरण तालुक्यात नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा येथे पुनर्वसन केले. मात्र या पुनर्वसन गावात म्हणजेच हनुमान कोळीवाडा गावात कोणत्याही मूलभूत सेवा सुविधा नाहीत. गेली 38 वर्षे पुनर्वसनासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी ग्रामस्थ प्रशासनासोबत लढत असून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून चॅनेल बंदचे आयोजन क करण्यात येणार आहे.
चार कोळीवाडातील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी जेएनपीटी प्रकल्पला (बंदराला )कवडीमोल भावात दिल्याने उपजीविकेचे कोणतेही साधन या ग्रामस्थांना उरले नाही.शासनाने नोकऱ्याही दिल्या नाहीत. या ग्रामस्थांना शासनातर्फे नोकऱ्याही मिळाले नाहीत. त्यामुळे गेली 38 वर्षे हनुमान कोळीवाडाचे ग्रामस्थ आपल्या पुनर्वसनासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनासोबत भांडत आहेत. 38 वर्षे केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करूनही या ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी, ग्रामस्थ 8 जानेवारीपासून शेवा कोळीवाडा गावात आपल्या मूळ गावी राहण्यास गेले आहेत. तिथे साफसफाई करून राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी गव्हाण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा,बोरी कोळीवाडा आणि हनुमान कोळीवाडा अशा चार कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी शेवा कोळीवाडा येथे एकत्र येऊन जे एम बक्षी चे समुद्रामार्गे येणारे जहाज अडवून(चॅनेल बंद करून)त्यादिवसा पासून एकच वेळी मासेमारी करण्याचा ठराव घेतला आहे. महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून हे चॅनेल बंद करण्यात येणार आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऍथॉरिटीचे व्यवस्थापन च्या सर्व एक्स्टेंशन व सेझ प्रकल्पात जिल्हाधिकारी रायगडने आयडेंटिफाय केलेल्या हनुमानकोळीवाडा, उरणकोळीवाडा, बेलपाडाकोळीवाडा, गव्हाणकोळीवाडा या 4 कोळीवाड्यातील 1630 प्रकल्प बाधित पारंपारिक मच्छिमार कुटुंबातील पिढीजात कामगारांना नोकऱ्या देत नसल्याच्या निषेधार्थ ती कुटुंबे मासेमारी जमिनीत घारापुरी मोरा दरम्यान जे एम बक्षीच्या उदघाटनाचे दिवसापासून महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून एकत्र मासेमारी करणार असल्याचा 19 जानेवारी 2023 रोजी बैठक घेऊन एकमुखी ठराव पास केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai