मोफत आरोग्य शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2023
- 528
नवी मुंबई : कोपरखैरणे येथे मेलसन्स चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गुरुवार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी दंतचिकित्सा, डोळे तपासणी, सीबीसी-आरबीसी रक्त तपासणी तसेच कोलेस्ट्रॉल, क्रिएटिन, कैल्शियम तपासणी करण्यात आल्या. या शिबिराचा सुमारे 100 नागरिकांनी लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिराला साई दृष्टी आय हॉस्पिटल सानपाडा, आशा डेंटल केअर क्लिनिक,कोपरखैरणे तसेच सुयश पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, कोपरखैरणे यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी डॉ. मच्छिंद्र वाघमारे यांनी पुढाकार घेतला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai