किसान कनेक्टनचे सानपाडा येथे नवीन दालन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 08, 2023
- 673
नवी मुंबई ः शेतातील ताज्या भाज्या, फळे, ग्रामीण भागातील स्टेपल्स व खाद्यपदार्थांची ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून शेतातून थेट दारी पुरवठा करणाऱ्या किसानकनेक्टने सानपाडा येथे नवीन प्रमुख दालन उघडून आपला बाजारपेठीय विस्तार केला आहे. यामुळे नागरिकांना थेट ताजा शेतमाल, भाजी, फळे मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
सीवूड्स, घणसोली आणि खारघर नंतर नवी मुंबईत उघडलेले किसानकनेक्टचे हे चौथे प्रमुख दालन आहे. सुमारे 350 चौरस फूट ते 550 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे नवीन स्टोअर नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर 17 मधील सीवूड्स गार्डन येथे आहे. किसानकनेक्टने या नवीन स्टोअरसह नवी मुंबईतील आपल्या भौगोलिक सेवेची व्याप्ती मजबूत केली आहे.
सानपाड्यातील नवीन स्टोअर हे लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला, फळे, ग्रामीण भागातील मुख्य पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या गरजा पूर्ण करणार आहे. हे स्टोअर शेतकऱ्यांच्या शेतातील ताजा, पौष्टिक, आरोग्यदायी आणि वापरण्यास सुरक्षित असा हंगामी, प्रादेशिक आणि स्थानिक भाजीपाला, फळे यांचा पुरवठा करेल. किसानकनेक्टे सकस मातीतून पुनरूपयोगी आणि शाश्वत शेती पद्धतींनी समृद्ध केलेल्या शेतमालाचे उत्पादन व वितरण करण्यावर भर दिला आहे.
फार्म ते घरपोच ताज्या भाज्या, फळे आणि अन्न वितरणाच्या क्षेत्रात मजबूत ऑनलाइन उपस्थितीनंतर, किसानकनेक्टने आता ओम्नी चॅनेल पद्धतीने बाजारपेठेमध्ये पूर्तता करण्याची योजना आखली आहे. याबाबत बोलताना विवेक निर्मल, सीईओ, किसान कनेक्ट सेफ फूड प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले, “आमच्या ओम्नी-चॅनेल धोरणाचा एक भाग म्हणून, आम्ही मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये प्रमुख स्टोअर्स उघडत आहोत. ग्राहकांसाठी ताज्या, उच्च दर्जाच्या आणि पौष्टिक अशा विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळवण्यासाठी विश्वासार्ह, वन-स्टॉप केंद्रे तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सानपाडा येथे हे आमचे खास स्टोअर असेल आणि नजीकच्या भविष्यात मुंबई आणि पुण्यातील विविध भागांमध्ये अशी 100 हून अधिक अशा प्रकारची दालने सुरू करण्याची आमची योजना आहे. लोकांपर्यंत ताजे, स्वच्छ आणि सुरक्षित रीतीने किमान वेळेत पोहोचले पाहिजे. सानपाडा व परिसरांतील लोकांच्या अन्नाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्ही भाजीपाला आणि फळे यांचा ताजेपणा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
- 3,000 हून अधिक शेतकऱ्यांचा समूह
किसानकनेक्ट शेतकऱ्यांना सामावून घेते. आज 3,000 हून अधिक शेतकऱ्यांचा हा समूह बनला आहे. हे शेतकरी निर्यातक्षम दर्जाचा, चवदार व आरोग्यपूरक अशा शाश्वत भाज्या आणि फळे यांचा पुरवठा करतात. सुरक्षित आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींसाठी सरकारच्या ‘इट राइट इंडिया' मिशनला पाठिंबा देण्यासाठी ‘इट राइट, फ्रॉम द फार्म' पद्धती अंगीकृत करण्यावर किसानकनेक्टकडून भर दिला जातो. सध्या किसानकनेक्ट मुंबई आणि पुण्याला फार्म फ्रेश अशा ताज्या फळभाज्यांच्या पुरवठा करते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai