उरण-पनवेल मार्ग दुरुस्तीसाठी बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 21, 2023
- 607
उरण ः उरण पनवेल हा रस्ता प्रवाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून दररोज हजारो प्रवाशी या मार्गांवरून प्रवास करतात. मात्र उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील दोन साकवच्या दुरुस्तीसाठी 20 मार्चपासून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सूचना फलक बसविले आहेत. त्यानुसार उरण-पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानक व आनंदी हॉटेलजवळील दोन साकव नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवारपासून उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण कोटनाका हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.
प्रवाशी वर्गांचे प्रवासात होणारे हाल, जनतेच्या मागणीचा विचार करून व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे समजते. उरण पनवेल हा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने उरण शहरात व शहरातून ये-जा करण्यासाठी नागरिकांनी नवीन शेवा-उरण चारफाटा मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai