मन की बात चे थेट प्रक्षेपण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2023
- 544
नवी मुंबई : देशातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात ही संकल्पना राबवली. मन की बात चा 99 व्या भागाचे थेट प्रक्षेपण बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गौरव कार्यालयात मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आला.
‘मन की बात'चा 99 वा भाग प्रसारित झाला. त्याचे थेट प्रक्षेपण माझ्या कार्यालयात सर्व पदाधिकारी यांच्यासह पाहिला. मोदी यांची विचारधारा वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपला देश प्रगतीची वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी एक मुलगी काय करू शकते हे आज देशाला नव्हे तर जगाला पटवून दिले आहे. महिलांप्रती त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी आज प्रभावित झाले आहे, अशा भावना मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केल्या. पुढे त्या म्हणाल्या, आज सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत. खेळाडू, कलाकार तयार होत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात महिला नाव कमावत आहेत. पालकांनीही त्यांना पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुलींना शिकवले पाहिजे, ती माहेर आणि सासर अशी दोन घरे चालवते. महिला कुठेही कमी नाही, असे सांगून मंदा म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai