159 अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2023
- 428
कामात सूसुत्रता येण्यासाठी पालिकेचा निर्णय
मुंबई ः पालिकेत विविध विभागातील तब्बल 150 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नतीनंतर त्यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विभागांच्या कार्यप्रणालीमध्ये सूसुत्रता येण्याच्या दृष्टीने अनेक वर्ष एका विभागात कार्यरत असलेल्या 159 अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे तब्बल 309 अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यापक स्वरूपातील बदलीचा व पदस्थापनेचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पदोन्नतीस पात्र 6 सहा.आयुक्त, 15 प्रशाकिय अधिकारी, 30 अधिक्षक / वसूली अधिकारी, 91 वरिष्ठ लिपिक /कर निरीक्षक, 1 लेखाधिकारी, 7 सहा. लेखाधिकारी अशा 150 इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना पदोन्नतीनंतरची पदस्थापना देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बरीच वर्ष एका विभागात काम करणाऱ्या 159 इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 5 लेखाधिकारी, 7 सहा. लेखाधिकारी, 14 उपलेखापाल, 1 सहा. आयुक्त, 3 प्रशासकिय अधिकारी, 3 अधिक्षक / वसूली अधिकारी, 25 वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक आणि 101 लिपिक अशा 159 कर्मचाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात विविध संवर्गातील 24 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आज 159 जणांची बदलीने पदस्थापना करण्यात आलेली असून एकूण 183 जणांच्या बदल्या झालेल्या आहेत.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय निर्णयाचा सकारात्मक परिणाम महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर होणार असून यामुळे नागरी सुविधा परिपूर्ती कार्याला अधिक गतीमानता प्राप्त होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai