भिडे यांच्याविरोधात पनवेलमध्ये गुन्हा दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 09, 2023
- 573
पनवेल : वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वकिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या तक्रारी अर्जानंतर हा गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वकिल अमित कटारनवरे यांनी पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीमध्ये आजपर्यंत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर वेळीच कार्यवाही न झाल्याने त्यांचे वादग्रस्त विधाने करण्याचे बळ वाढत असल्याचे म्हटले आहे. भिडे यांच्या बेकायदेशीर कृत्यांना वेळीच अटकाव न केल्यास राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात संपत्तीचे व मानव प्रजातीचे नुकसान होऊन दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची भिती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. भिडे यांनी 11000 तलवारधारी तरुणांचा पहारा गडावर सुवर्ण सिंहासन झाल्यावर ठेवण्यासाठी तुकडी करा असा आदेश भिडे यांनी तरुणांना दिला आहे. त्यामुळे तलवारधारी तरुणांचे माथे भडकावुन त्यांचा दुरुपयोग करुन राज्यात आणि देशात हिसांचार होण्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तविली आहे. भिडे यांची विधाने अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तक्रारदार वकिल यांनी कायद्याने भिडे यांच्यावर कोणती कलमे लागतील असा तपशील पोलीसांना लेखी तक्रारी अर्जात दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai