सोन्याचा नारल दर्याला....
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 31, 2023
- 348
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोळीवाड्यात परंपरागत चालत आलेल्या नारळी पौर्णिमेला कोळीगीतांच्या तालावर थिरकत मिरवणूक काढून दर्याराजाला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळे व सारसोळे गावात सर्वत्र धामधूम सुरू होती. ‘सण आयला गो नारळी पुनवेचा' या कोळीगीताने उत्सवाची धामधूम सुरू झाली. सकाळी गावातून कोळीबांधवांनी पालखीची मिरवणूक काढली. कोळी समाजातील पुरूष, महिला आणि लहान मुले पारंपारिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनतर कोळीगीताचे, नृत्यांचे मनोरंजनपर कार्यक्रम पार पडले. कोळीवड्यात पारंपरिक वाद्य वाजवून आंनद द्विगुणित करण्यात आला. कोळीनृत्यात लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विविध नृत्य सादर केली. जेटीवर पालखी आल्यावर आरती घेऊन या पालखी सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या होड्या नारळ खाडीमध्ये सोडण्यासाठी रवाना झाल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai