बेकायदा राहणाऱ्या नागरिकांवर धाडसत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 02, 2023
- 246
नवी मुंबई: गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबईत सर्वत्र बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या विरोधात शुक्रवारपासून धाडसत्र सुरु केले आहे. व्हिजा संपल्यानंतरही देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सहा ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग केले. या प्रकरणी 15 पेक्षा अधिक विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. तर काहींकडे अमली पदार्थ सदृश्य पदार्थ आढळून आले असून त्यांची रात्री उशिरापर्यंत चाचपणी सुरु होती. यात सर्वाधिक नागरिक हे आफ्रिका खंडातील देशांचे आहेत.
शिक्षण, व्यवसाय यांच्या निमित्ताने देशात आलेल्या विदेशी व्यक्ती व्हिजा संपल्यानंतरही परत मूळ देशात जात नाहीत. त्यामध्ये बांग्लादेशी व नायझेरियन व्यक्तींचा मोठा समावेश वेळोवेळी दिसून आलेला आहे. त्यापैकी बहुतांश नायझेरियन व्यक्ती ह्या अमली पदार्थांच्या तष्क्रीत सहभागी आहेत. तर घुसखोर बांग्लादेशी व्यक्ती ह्या बांधकाम किंवा इतर ठिकाणी मजूर म्हणून नोकरी मिळवून वास्तव्य करत असल्याचे आढळून येते.दरम्यान, भारतात अशा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इतर देशातील व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम राबवण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात शुक्रवारी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामध्ये परिमंडळ एक मध्ये तीन ठिकाणी तर परिमंडळ दोन मध्ये तीन ठिकाणी विदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. वाशीतील जुहू गाव, जुहू गाव खाडी परिसर, बोनकोडे खैरणे गाव तसेच पनवेल खारघर परिसरातील शहरापासून नजीक असलेली गावे येथे शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. या मध्ये वाशीतील जुहू गाव येथे पाच नायझेरिया देशाच्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरत्र 10 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावरच किती व्यक्ती बेकायदा भारतात वास्तव्य करतात हे समोर येईल असेही पोलिसांनी सांगितले.
कारवाई दरम्यान काहींकडे अमली पदार्थ सदृश्य पदार्थ आढळून आले आहेत. हे पदार्थ ताब्यात घेऊन त्यांची अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत त्यांची पडताळणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai