शिरीष घरात यांच्यावर गुन्हा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2023
- 242
सिडकोला घातला साठ कोटीं गंडा
नवी मुंबई : सिडकोला हस्तांतरित केलेला भूखंड परस्पर विकून त्या बदल्यात पुन्हा सिडकोकडून 60 कोटी रुपयांचा 2500 चौ. मी. चा भूखंड वितरित करून घेऊन सिडकोची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक वसाहत अधिकारी सिडको आशा बनसोडे यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिरीष घरात यांनी त्यांची जमीन सर्वे नंबर 474 जुना गट क्र. 17 बेलपाडा गाव खारघर ही जमीन सिडकोला रस्ते व रेल्वे प्रकल्पासाठी देण्याचे मान्य केले. या जमिनीच्या बदल्यात त्यानी आपल्याला पर्यायी भूखंड देण्यात यावा अशी मागणी सिडकोकडे केली होती. सिडकोने 28 फेब्रुवारी 2022 रोजी 2500 चौ.मी.च्या भूखंडाचे इरादा पत्र देऊन 21 एप्रिल 2022 रोजी मालकी हक्काने नोंदणीकृत करार केला. घरत यांनी त्यांच्या मालकीचा सर्वे नंबर 474 जुना गट नंबर 17 मधील 2500 चौ.मी. मीटर क्षेत्राची कब्जे पावती सिडको यांचे नावे लिहून दिली. परंतु त्यापूर्वीच सदर भूखंड 21 जानेवारी 2022 रोजी घरत यांनी मे. के. एस. श्रिया इन्फ्राबिल्ड प्रा. लि. व मे. विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना सात कोटी रुपयांना विकून त्या बदल्यात 1 कोटी 98 लाख रुपये घेतले. असे असतानाही सदर जागा घरत यांनी सिडकोला हस्तांतरित करून त्या बदल्यात खारघर नोड येथील सेक्टर सात मध्ये 2500 चौ.मी. मीटरचा भूखंड सिडको कडून पदरात पडून घेतला. घरत यांनी सिडकोची फसवणूक केली म्हणून सहाय्यक वसाहत अधिकारी आशा बनसोडे यांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 406 420 अन्वये सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai