अनधिकृत शाळांना 15 कोटी 54 लाख रुपयांचा दंड
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 07, 2023
- 312
नवी मुंबई ः महापालिकेच्या क्षेत्रातील 4 अनधिकृत शाळांना 15 कोटी 54 लाख 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच या शाळांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्यामुळे त्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना दिले आहेत. महापालिकेच्या क्षेत्रात वर्ष 2000 पासून अद्याप सुमारे 35 अनधिकृत शाळा होत्या. या अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याच्या वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटिसांना दाद न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये आर्टिस्ट व्हिलेज सी.बी.डी. सेक्टर-8 बी येथील अल मोमिना शाळेला 5 कोटी 50 लाख 20 हजार रुपये, नेरूळ सेक्टर-27 येथील इकरा इंटरनॅशनल स्कूल 2 कोटी 24 लाख 70 हजार रुपये, सीवूड सेक्टर-40 येथील द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल 1 कोटी 19 लाख 50 हजार रुपये, रबाळे आंबेडकर नगर येथील इलिम इंग्लिश स्कूल 6 कोटी 59 लाख 70 हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.
केवळ यातील द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळेने 3 लाख 10 हजार रुपये दंड भरला आहे. अन्य कोणत्याही शाळेने महापालिकेच्या नोटिशीला दाद दिली नाही. यादरम्यान वारंवार नोटिसा पाठवल्यामुळे 35 पैकी काही शाळा बंद झाल्या; तर काही शाळांना शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai