कामोठेत आगीची घटना
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2024
- 355
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
नवी मुंबई : कामोठे येथे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मोकळ्या जागेतील गवतास लागलेली आग भीषण स्वरूप धारण करण्या अगोदरच अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. नववर्षाच्या स्वागतासाठी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे सदर प्रकार घडल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
गतवर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तरुणांकडून मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. रविवारी रात्री कामोठे सेक्टर 25 मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी अतिउत्साही तरुण फटाके फोडत असताना खांदेश्वर स्टेशनजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या जागेतील सुक्या गवताला आग लागली. या ठिकाणी सुकलेले गवत मोठया प्रमाणात असल्यामळे आग भडकण्याची भीती होती. परंतु, कामोठे पोलीसांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने ही आग लगेचच आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठी हानी टळली. परिसरातील रहिवाश्यांनी पोलिसांचे व अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai