विद्यार्थ्यांसाठी शाळेत ड्राय वेस्ट बँक उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2024
- 330
नवी मुंबई ः मुलांना संस्कारक्षम अशा लहान वयापासूनच स्वच्छतेची सवय लागावी व त्यांच्या मनात स्वच्छता संकल्पनेची रुजवात व्हावी या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका विविध अभिनव उपक्रम राबवित असते. अशाच प्रकारचा ड्राय वेस्ट बँक हा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर ते वाशी विभाग कार्यक्षेत्रातील 15 शाळांमध्ये राबविला जात असून त्याला विदयार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून विदयार्थ्यांमध्ये कचरा निर्मितीच्याच ठिकाणी ओला व सुका असे वर्गीकरण करणे ही संकल्पना अंमलात आणली जात आहे.
ड्राय वेस्ट बँक उपक्रमांतर्गत विदयार्थ्यांना विविध प्रकारचा सुका कचरा गोळा करण्याकरीता कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आलेले असून त्यांनी जमा केलेला प्लास्टिक बॉटल, चिप्स व चॉकलेट्सचे कव्हर, काचेच्या बाटल्या असा सुका कचरा आठवडयातून एकदा ठरविण्यात आलेल्या दिवशी शाळेत आणला जातो. या उपक्रमांत सहभागी विदयार्थ्यांना त्यांच्या वर्ग शिक्षकामार्फत पासबुक वितरित करण्यात येते. विदयार्थ्याने आणलेल्या सुक्या कच-यानुसार त्यास पॉईंट्स दिले जातात. यामध्ये पेट बॉटलला 2 पॉईंट्स, चिप्स, चॉकलेटच्या 10 कव्हरला 1 पॉईंट, घरगुती प्लास्टिकला 2 पॉईंट्स, काचेच्या बॉटलला 2 पॉईंट्स, ट्रेट्रा पॅक/टिनला 2 पॉईंट्स अशाप्रकारे आणलेल्या विविध वस्तूंना पॉईंट्स दिले जाउुन त्याची नोंद पासबुकमध्ये घेतली जाते. प्रत्येक 100,200,500 पॉईंट्स नंतर विदयार्थ्यांना प्रोत्साहानात्मक शैक्षणेिक वस्तूंचे वाटप केले जाते. 2 हजारहून अधिक पॉईंट्स प्राप्त करणाऱ्या विदयार्थ्यास ‘वेस्ट वॉरिअर' प्रमाणपत्र दिले जाते. हे जमा झालेले प्लास्टिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वतंत्रपणे उचलले जाऊन त्याचे तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी स्वतंत्र संकलन केले जाते.
सद्यस्थितीत ड्राय वेस्ट बँक हा उपक्रम बेलापूर व वाशी विभागातील 15 शाळांमध्ये राबविला जात असून त्यामध्ये 2771 विदयार्थी सहभागी आहेत. त्यामध्ये सर्वोत्तम पॉईंट्स प्राप्त करणाऱ्या स्वच्छतेविषयी जागरुक विदयार्थ्यांचा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते संकल्प स्वच्छतेचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. एस एस हायस्कूल, सेक्टर 44, सीवूड नेरुळ येथील विदयार्थी शुभम पाल याने सर्वांधिक 2500 पॉईंट्स प्राप्त केले असून नमुंमपा शाळा क्रमांक 2, दिवाळे गाव येथील विदयार्थिंनी एकता सुरेश कोळी हिने 2025 पॉईंट्स व नमुंमपा शाळा, वाशीगाव येथील विदयार्थी वंश केशव शिंदे याने 700 पॉईंट्स मिळविलेले आहे. या तिन्ही विदयार्थ्यांचा आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. विदयार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करणाऱ्या ‘ड्राय वेस्ट बँक' सारख्या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी आगामी काळात इतरही शाळांमध्ये करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai